स्थायी समिती सभापतीपदी 
अभिषेक बारणे बिनविरोध

स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे बिनविरोध

Published on

पिंपरी, ता. २८ ः महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे अभिषेक बारणे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर त्यांनी पदाची सूत्रे स्विकारली.
स्थायी समिती अध्यक्ष निवडीसाठी दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात समितीची विशेष सभा झाली. पीठासीन अधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन होते. त्यांनी अध्यक्षपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी केली. त्यात बारणे यांचा एकमेव अर्ज होता. तो वैध ठरला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रदीप चंद्रन यांनी जाहीर केले. आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीणकुमार जैन, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. महापौर रवी लांडगे, पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह नगरसदस्यांनी बारणे यांचे अभिनंदन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com