डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात
पिंपरी, ता. २८ ः डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटरमध्ये पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात झाली. ‘डिजिटल परिवर्तन आणि हरित वाढ’ (डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ) असा परिषदेचा विषय होता.
१२ देशांचा सहभाग, १३५ संशोधन निबंधांचे सादरीकरण आणि २६ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची उपस्थिती, ३५० हून अधिक संशोधन निबंध सादरकर्ते, संशोधक, उद्योगतज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दोन दिवसीय परिषदेतील विविध चर्चासत्रांमध्ये नवोन्मेष, शाश्वत विकास आणि सुशासन या विषयांवर विचारमंथन झाले. त्यातून सशक्त, समावेशक व शाश्वत जागतिक अर्थव्यवस्था कशी उभारता येईल, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव व प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव आणि कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद झाली. उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी प्रास्ताविकातून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि सार्वजनिक धोरण यांच्या संगमावर संवाद घडवून आणण्याची विद्यापीठाची भूमिका अधोरेखित केली. डॉ. स्मिता जाधव यांनी आयटीसीच्या ‘ई-चौपाल’ मॉडेलचा संदर्भ देत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे सक्षमीकरण कसे साध्य होऊ शकते, यावर प्रकाश टाकला. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेट्री यांनी ३डी प्रिंटिंग व कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानामुळे भारत संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात अग्रस्थान मिळवू शकतो, असे मत व्यक्त केले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

