वाचक लिहीतात

वाचक लिहीतात

Published on

रस्त्यावर होळी नको

होळी साजरी करताना ती आपल्या सोसायटीच्या आवारातच करावी. महापालिकेने तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर होळी पेटवू नये. रस्त्यावर पेटवलेल्या होळीतील जळालेली लाकडे अनेक दिवस तसेच पडून राहतात. तसेच आगीमुळे रस्ता खराब होऊन त्या ठिकाणी खड्डे पडतात.
कोणीही रस्त्यावर होळी पेटवू नये आणि आपल्या सोसायटीच्या परिसरातच सण साजरा करावा. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी.
- हिरामण रामटेके, रावेत

Marathi News Esakal
www.esakal.com