पुजाऱ्याचा वेश घालून मुकुट चोरणारा ४८ तासांत गजाआड
पिंपरी, ता. २८ : पुजाऱ्याचा वेश घालून चिंचवड स्टेशन परिसरातील एका मंदिरात देवाच्या मूर्तीचा एक किलो चांदीचा अडीच लाख रुपये किमतीचा मुकुट चोरलेल्या प्रौढाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अवघ्या ४८ तासात मुंबईत गजाआड केले. त्याच्याकडून मुकुट जप्त करण्यात आला.
नरेश अगरचंद जैन (वय ४९, रा. भुलेश्वर, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. युनिट एकच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेत दोन पथके तयार केली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पुजाऱ्याच्या वेशातील व्यक्तीने चोरी केल्याचे उघड झाले. त्यानंतर परिसरातील दोनशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असताना जैनचे नाव निष्पन्न झाले.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कसून शोध घेत त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. तो गुन्हा करून सतत पता बदलायचा असे तपासात समोर आले. त्याच्यावर मलबार हिल पोलिस ठाण्यात तीन, घाटकोपर पोलिस ठाण्यात दोन व डीपी रोड, एल.टी. मार्ग, डोंबिवली, आर. ए. के, नागपाडा, आझाद चौक, सायन या पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत.
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

