धुळवड खेळताना हे सुद्धा लक्षात ठेवा !
पिंपरी, ता. १ ः वसंत ऋतूची सुरुवात आणि मराठी वर्षातील सर्वात शेवटचा सण म्हणजे धुलिवंदन. शहरी भागात धुळवडीला तर ग्रामीण भागांमध्ये रंगपंचमीला रंग खेळले जातात. बुरा ना मानो होली है ! असं म्हणत एकमेकांसोबत रंगांची उधळण केली जाते. धुळवड खेळताना शरीराची काळजी घ्यावी असे वैद्यकीय तज्ज्ज्ञांनी आग्रहाने सांगितले आहे.
सोसायट्या, कॉलनी, गल्लोगल्ली रंग उधळले जातात. लहान मोठे या दिवशी रंगात न्हाऊन निघतात. मात्र, हे करत असताना आपल्या त्वचेची आणि डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याला अपाय होऊ नये नैसर्गिक रंग वापरणे, रंग खेळण्यापूर्वी व नंतर काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
धुलिवंदन पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ठिकठिकाणी होळीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मित्र-परिवारासोबत रंग खेळणे, पाण्यात भिजणे ही सणाची खासियत आहे. मात्र, या सणासाठी बाजारात दाखल झालेले रंग कृत्रिम रसायनांपासून बनवलेले असतात. या रंगांमध्ये शिसे, पारा, क्रोमियम, कॉपर सल्फेट, मिका पावडर यांसारखे घटक असू शकतात. हे घटक त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे होळी ही नैसर्गिक व कोरड्या रंगांनीच खेळावी असा सल्ला डॉक्टर देतात.
रासायनिक रंगांमध्ये होणारे संभाव्य दुष्परिणाम
- काही रासायनिक रंगांमुळे लालसरपणा, खाज, सूज, पुरळ किंवा चट्टे येणे
- त्वचेची जळजळ होणे, त्वचा कोरडी पडणे
- रंग, घाम, धूळ आणि तेल यांच्या मिश्रणामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात.
- तीव्र उन्हात रंग खेळल्यामुळे त्वचा काळवंडते.
- रंग डोळ्यात जाऊन डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे
- डोळे लाल होणे
होळीपूर्वी घ्यावयाची काळजी
- रंग खेळण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चरायझर व सनस्क्रीन लावा.
- चेहरा, हात, पाय व केसांना यांना नारळाचे किंवा बदामाचे तेल लावा.
- पूर्ण बाह्यांचे व सुती कपडे परिधान करा
- नैसर्गिक रंगांची निवड करा
होळी खेळताना
- चेहऱ्यावर रंग घासू नका.
- डोळे आणि तोंड सुरक्षित ठेवा.
- भरपूर पाणी प्या.
- जास्त वेळ ओले कपडे अंगावर ठेवू नका.
होळीनंतरची काळजी
- प्रथम साध्या पाण्याने रंग धुवा
- सौम्य फेसवॉश किंवा क्लेन्झर वापरा
- अलोव्हेरा जेल / कॅलामाइन लोशन लावा
- त्वचा पूर्णपणे कोरडी पुसा
- ओले कपडे त्वरित बदला
- आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीफंगल पावडर वापरा
- केसांसाठी सौम्य शाम्पू व कंडिशनर वापरा
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
- तीव्र सूज किंवा फोड
- सतत खाज किंवा जळजळ
- गोलाकार लालसर डाग
- डोळ्यांना त्रास
- केस अचानक गळणे
⸻
होळीच्या दिवशी जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे आणि पाण्यात भिजल्यामुळे शरीराला भरपूर घाम येतो. रंग ओले झाल्यामुळे ते लवकर निघत नाहीत. व त्यांचा संसर्ग होऊन शरीरावर पुरळ येऊ शकतात तसेच खास सुटू शकते. त्यामुळे रंग खेळल्यानंतर पाणी न खेळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रंग जरी नैसर्गिक वापरले तरी ते डोळ्यात जाऊ नये यासाठी गॉगल वापरावा. होळीचा आनंद नक्की घ्या, परंतु त्वचेची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
- डॉ. पल्लवी डोळस, त्वचारोग तज्ज्ञ
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

