विषय समिती सभापतींनी स्वीकारला पदभार

विषय समिती सभापतींनी स्वीकारला पदभार

Published on

पिंपरी, ता. ३ ः महापालिका विविध समितींच्या सभापतिपदाची निवडणूक मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झाली. यामध्ये विधी समिती सभापतिपदी सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी राणी पठारे, शहर सुधारणा समिती सभापतिपदी संजय काटे, क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतिपदी कैलास कुटे आणि शिक्षण समिती सभापतिपदी रवीना आंगोळकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी आपापल्या पदाचा कारभार स्वीकारला.
महापालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतिपदासाठी केवळ भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिले होते. बुधवारी (ता. २५) दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. या कालावधीत केवळ भाजपच प्रत्येकी एकेका सदस्याने नगरसचिव मुकेश कोळप यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. मात्र, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार निवड प्रक्रिया कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाने जाहीर केला होता. त्यानुसार सोमवारी (ता. २) सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत निवड प्रक्रिया झाली. त्यासाठी त्या त्या विषय समित्यांची विशेष सभा आयोजित केली होती. सर्व सभांचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी तथा पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी कामकाज पाहिले. आलेल्या अर्जांची त्यांनी छाननी केली. त्यात सर्व अर्ज वैध ठरल्याने सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली. पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छाही दिल्या. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

विशेष समिती सभांचे वार आणि वेळ
विधी समिती ः महिन्याचा पहिला व तिसरा शुक्रवार, दुपारी ३ वाजता
महिला व बालकल्याण ः महिन्याचा दुसरा व चौथा गुरुवार, दुपारी २.३०
शहर सुधारणा ः महिन्याचा दुसरा व चौथा मंगळवार, दुपारी २
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक ः महिन्याचा दुसरा व चौथा शुक्रवार, दुपारी २.३०
शिक्षण ः महिन्याचा पहिला व तिसरा गुरुवार, दुपारी २.३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com