सांगवी विसर्जन मिरवणूक जोड

सांगवी विसर्जन मिरवणूक जोड
Published on

जुनी सांगवीमध्ये गंगानगर येथील गणराज मित्र मंडळ, महादेव आळी मित्र मंडळ, रणझुंजार मित्र मंडळांनी डीजेच्या तालावर मिरवणुका काढल्या. आनंदनगर मित्र मंडळ, गंगानगर मित्र मंडळांच्या
आकर्षक सजावटींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. श्री शिवाजी तरुण मंडळ, शितोळेनगर क्रीडा मित्र मंडळ, सिद्धिविनायक सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट आणि अखिल शिवस्मृती मित्र मंडळाने सजविलेल्या रथातून श्रींची मिरवणूक काढली. यासोबतच जय माता दी मित्र मंडळ, प्रियदर्शनीनगर मित्र मंडळ, अखिल ममतानगर मित्र मंडळ, पवनानगर मित्र मंडळ, जयभवानी मित्र मंडळ व शिवशक्ती मित्र मंडळानेही जल्लोषात सहभाग नोंदवला. ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात रात्री उशिरापर्यंत विसर्जन पार पडल्या.
नवी सांगवीमधील मिरवणुकांत समतानगर मित्र मंडळ, अखिल क्रांती चौक मित्र मंडळ, नवी सांगवी विभागीय मित्र मंडळ, कृष्णाई मित्र मंडळ, चैत्रबन मित्र मंडळ, कीर्तीनगर मित्र मंडळ, वागजाई मित्र मंडळ आणि बारामती मित्र मंडळाने मोठ्या दिमाखात बाप्पाला निरोप दिला.


विसर्जनाची क्षणचित्रे...
- नवी सांगवीत कीर्तीनगर मंडळाच्या मिरवणुकीत ढोल ताशा पथकाचे वादन
- मराठा युवा प्रतिष्ठान, ओम साई मित्र मंडळाची डीजेसह मिरवणूक
- जुनी सांगवी विसर्जन घाटावर महापालिका प्रशासनाच्या वतीने चोख स्वच्छता
- पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात
- नदीचे प्रदूषण टाळण्याच्या प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- नदीपात्राऐवजी निर्माल्य थेट निर्माल्य कुंडात जमा


ध्वनीची पातळी ५५ डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्यास आमच्या पोलिस पथकाकडून त्याची तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com