सकाळ संवाद
तुटलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
पुणे नाशिक महामार्गावरील मोशीतील बनकर वस्ती येथील चेंबरची दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित महापालिका विभागाने हे चेंबर त्वरित दुरुस्त करावे.
- मंगेश बनकर, मोशी.
नळातून पाणी गळती
संभाजीनगर येथील श्री साई गार्डन येथे पाण्याची टाकीच्या आहे. या टाकीच्या नळातून मागी काही दिवसापासून पाणीगळती सुरु आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ही गळती सुरू असल्याने येथील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे महापालिकेने या समस्येची दखल घेऊन या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी.
- एक नागरिक.
‘नो पार्किंग’मध्ये वाहन उभी केल्याने वाहतूक कोंडी
चिंचवड लिंकरस्ता येथे रस्त्यावर ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होते. या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. येथून प्रवास करणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिसरात अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई हा रस्ता रहदारीसाठी रिकामी रहदारीसाठी रिकामी करून द्यावा.
- शुभांगी गिरमे, चिंचवड
नामफलकाची दुरवस्था
आकुर्डी येथील नाम फलकाची दुरवस्था झाली आहे. येथील फलक कोलमडून पडला आहे. या फलकाची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- एक नागरिक.
डांबरीकरण नसल्याने धुळीचा त्रास
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरी ते आकुर्डी बीआरटी मार्गिकेवर जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. येथील खड्डे बुजवून खडी टाकण्यात आली आहे. मात्र, त्यावर डांबरीकरण केलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करणे आवश्यक आहे.
- ओंकार झगडे, चिंचवड.
महापालिका उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था
चिंचवडमधील भोईर कॉलनी येथील कै. भागूजी गोलांडे उद्यानातील खेळणी मागील दोन वर्षापासून दुरुस्त करण्यात आली नाहीत. येत्या काही दिवसात परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या लागणार आहेत. सुट्ट्यांमध्ये लहान मुलांची पावले या उद्यानातील खेळण्याकडे वळतील. त्यामुळे उद्यान विभागाने ही खेळणी लवकर दुरुस्त करावीत.
- एक नागरिक.
रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग
वाकड येथील कस्पटे वस्ती परिसरातील कल्पतरू हार्मोनि सोसायटी समोरील रस्त्यावर कचऱ्याचा ढीग, राडारोडा, भंगार साहित्य, माती, मुरूम, झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. माती, मुरूम यांची धुळ हवेत उडून प्रचंड प्रमाणात प्रदूषण देखील होत आहेत. त्यामुळे महापालिकेने या परिसराची पाहणी करून रस्त्यालगतचा कचरा उचलून हा परिसर स्वच्छ करावा.
- दिलीप बाफना, वाकड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

