

पिंपरी, ता. २४ : ईद ए मिलादनिमित्त पिंपरीतील मिलिंदनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पीएमपीएल मैदानापर्यंत मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शहर परिसरातील चिखली, नेहरूनगर, वाकड, भोसरी, निगडी, कासारवाडी, काळेवाडी येथून मुस्लिम बांधव पायी सहभागी होणार आहेत. मिरवणूक संपल्यानंतर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील पीएमपीएल मैदान येथे प्रवचन होणार असून ते ऐकण्यासाठी मुस्लीम बांधव जमा होणार असल्याने मिरवणूक व सभेच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. हा बदल बुधवारी (ता. २६) दुपारी बारा ते रात्री बारा या कालावधीसाठी असेल.
*वाहतुकीस बंद असलेले मार्ग कंसात पर्यायी मार्ग
- महावीर चौक चिंचवडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे जाणारा सेवा रस्ता (ही वाहने डी मार्ट ग्रेड सेपरेटर इन मार्गे)
- नाशिक फाट्याकडून पिंपरीकडे येणार सेवा रस्ता (डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर)
- स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोरवाडी चौक मार्गे)
- नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (एच ए. कॉर्नर बस थांबा येथून मासुळकर कॉलनीमार्गे)
- सम्राट चौक ते मोरवाडी चौक (सम्राट चौक ते ऑटो क्लस्टर मार्गे)
- सायन्स पार्क ते मोरवाडी (ऑटो क्लस्टर ते मदर तेरेसा पूल तसेच बसवेश्वर चौक)
- क्रोमा शोरुम ते गोकूळ हॉटेल (क्रोमा शोरुम- पिंपरी पुलावरून भाटनगर मार्गे)
- जुना मुंबई पुणे महामार्ग सेंट्रल चौकाकडून भक्ती शक्ती चौक (सेंट्रल चौक भक्तीशक्ती उड्डाणपुलावरून रुद्रा पार्किंगकडून ग्रेडसेप्रेटर मार्गे सरळ)
- अंकुश चौकाकडून भक्ती शक्ती सर्कल (अंकुश चौक भक्ती शक्ती पुला खालून अप्पूघर मार्गे)
- टिळक चौकडून खंडोबा माळ (टिळक चौकातून डाव्या बाजूस वळून दुर्गा चौक, थरमॅक्स चौक मार्गे)
- स्वानंद डेअरी चौकाकडून लोकमान्य टिळक चौक (दुर्गानगर चौक-अंकुश चौक मार्गे-भक्ती शक्ती ब्रिज अंडरपास मार्गे)
- आकुडी गावठाण, दळवीनगर पूल व थरमॅक्स चौकाकडून खंडोबामाळ चौकात येण्यास (थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक खडीमशीन वाय जंक्शन, परशुराम चौक मार्गे व आकुर्डी गावठाण व गणेश व्हीजनकडून येणारी वाहतूक थरमॅक्स चौकाकडे न जाता डाव्या बाजूने टिळक चौक मार्गे)
- कृष्णानगर चौक येथून चेरी चौक (थरमॅक्स चौक किंवा साने चौक मार्गे)
- पिंगळे चौक येथून पाटीलनगर चिखली येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (पिंगळे चौक येथून उजव्या बाजूला वळून नेवाळे कॉर्नर येथून)
- लक्ष्मी चौक येथून रिव्हर व्हयू चौक येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई (लक्ष्मी चौक येथून डाव्या बाजूने शिवरोड मार्गे)
- केएसबी चौक येथून कुदळवाडी सर्कल येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई निगडीकडून येणारी वाहने केएसबीचौक येथील अंडरपासने पुढे जाऊन यशवंतनगर चौक मार्गे जातील. तर भोसरीकडून येणारी वाहने केएसबीचौक येथील अंडरपासने पुढे जाऊन एमआयडीसी कॉलनी चौक मार्गे जातील)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.