

चाकणमधील रस्त्यांची दुर्दशा
चाकणच्या सर्वच प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी अतिक्रमणे हटविली जातात; मात्र त्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याचे काम केले जात नसल्याने पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या रिक्षा तसेच फळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी होते. त्यामुळे मोठ्या कंटेनर वाहनांना वळण घेताना अडचणी येतात आणि अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. दरम्यान, सुमारे तीन महिन्यांपूर्वी चाकणमधील माणिक चौकापासून पुढे सुमारे ५०० मीटर रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या दोन पावसांतच या रस्त्यावर खड्डे पडले. शासन व संबंधित प्रशासनाने चाकणमधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार रस्ते करावेत, तसेच अतिक्रमणांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
- कीर्ती कुमार शहा, चाकण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.