

सोमाटणे, ता. २५ : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय १४व्या युनिफाईड अजिंक्य क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत सोमाटणे येथील स्वारा मुऱ्हे हिने सुवर्णपदक, तर यश म्हस्के याने रौप्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंची शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील युनिफाईड अजिंक्य क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अरिंजय मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने स्वारा मुऱ्हे आणि यश म्हस्के यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. १४ वर्षांखालील वयोगटातील अटीतटीच्या लढतींमध्ये स्वाराने सुवर्णपदकावर नाव कोरले, तर यशने रौप्यपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. स्वाराने यापूर्वी गट, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये २५ सुवर्णपदके, पाच कांस्यपदके आणि दोन रौप्यपदके मिळविली आहेत. आतापर्यंत एकूण ३२ पदके पटकावणारी ती मावळ तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षक यशवंत माने आणि संदीप माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल सोमाटणे ग्रामस्थांनी दोन्ही खेळाडूंचे विशेष कौतुक केले.
PNE26W44632
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.