कासारसाई धरणातील
पाण्याची टक्केवारी कमी

कासारसाई धरणातील पाण्याची टक्केवारी कमी

Published on

सोमाटणे, ता. ३ ः तापमान वाढल्याने पाण्याचा वापर वाढला असून धरणातील पाण्याच्या साठ्याची टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. गेल्या सुमारे महिन्याभरापासून थंडी कमी होऊन तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअयसपर्यंत पोहचले आहे. मार्च महिन्यात उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान वाढल्याने शेतीसाठीही पाण्याची गरज वाढली आहे. बाष्पीभवनाचा वेगही वाढल्याने धरणातील पाण्याचा वापर वाढला आहे.
अद्याप पावसाळा सुरु होण्यास चार महिने अवधी असल्याने शेतकरी तसेच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. कासारसाई धरण शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार धरणात उपयुक्त पाणीसाठा ९.७५ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा ११.७ दशलक्ष घनमीटर आहे. धरणात ६०.७३ टक्केच पाणी आहे. हा पाणीसाठा पुढील चार महिने वापरायचा असल्याने पाण्याचा अपव्यय टाळावा, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
---
फोटो
00278
-----------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com