होळी जोड
पिंपळे गुरव परिसरात नकारात्मक मूल्यांची होळी
पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक ५४ मध्ये महापौर रवि लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. प्रतीकात्मक स्वरुपात ‘फसवणूक, खोटं बोलणे, मोह, भांडणे, स्वार्थ, चोरी, अहंकार, चिडचिड आणि भ्रष्टाचार’ या नकारात्मक प्रवृत्तींची होळी पेटविण्यात आली. समाजात प्रामाणिकपणा, बंधुभाव, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांसारखी मूल्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, ‘पर्यावरण रक्षक हेच मूल्यशिक्षण’, ‘नैसर्गिक रंग वापरा, पाणी वाचवा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच राधिका अग्रे हिने महापौरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिज्ञा घेत ‘प्रत्येक वर्षी होळी नैसर्गिक रंगांच्या माध्यमातूनच साजरी करू,’ असा संकल्प केला.
या प्रसंगी शिक्षण विभागाच्या सभापती रविना आंघोळकर, नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, शशिकांत कदम, पर्यवेक्षक ज्योती तापकीर, श्रीकांत चौगुले, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली पोळ, पांडुरंग मुद्गुन आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

