गुढी पाडव्याच्या तयारीला वेग; 
साडी दुकानांत ग्राहकांची रांग

गुढी पाडव्याच्या तयारीला वेग; साडी दुकानांत ग्राहकांची रांग

Published on

सोमाटणे, ता. १४ : गुढी पाडवा सण जवळ आल्याने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सोमाटणे येथील साडी दुकानांमध्ये महिलांची मोठी गर्दी होत आहे. नवीन वर्षात नवीन साडी घेण्याची परंपरा असल्यामुळे पवनमावळातील महिला उत्साहाने साडी खरेदी करताना दिसत आहेत.
पवनमावळात गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन साडी नेसण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यामुळे पाडवा सणाच्या चार-पाच दिवस अगोदरच महिला साडी खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करत असतात. साडी विक्रेत्यांकडूनही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही प्रमाणात सवलत दिली जात आहे. पाडवा अवघ्या चार दिवसांवर आल्याने सोमाटणे परिसरातील अनेक महिला सकाळपासूनच साडी खरेदीसाठी दुकानांकडे वळताना दिसल्या. येथील साडी दुकानांमध्ये महिलांच्या पसंतीच्या कांजीवरम, पेशवाई, बनारसी, पैठणी, सुरती, सिल्क आदी विविध प्रकारच्या साड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
‘‘नवीन वर्षात नवीन साडी घेण्याला महिलांची विशेष पसंती असते. ग्राहकांच्या आवडीनुसार विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध करून देत असल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे,’’ अशी माहिती राजकुमार छाप्रवाल यांनी दिली.

PNE26W03523
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com