विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशासन, स्वयंशिस्त हवी

विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशासन, स्वयंशिस्त हवी

Published on

पिंपरी, ता. १५ : ‘‘यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशासन, स्वयंशिस्त हवी,’’ असे मार्गदर्शन भांडारकर ॲकॅडमीचे संस्थापक संचालक अभिजित भांडारकर यांनी केले. ‘सकाळ’ विद्या व भांडारकर ॲकॅडमीच्या वतीने रविवारी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी (ता.१५) ‘गणिताशी मैत्री’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या चर्चासत्राला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ व करिअर समुपदेशक सुरेश कटारे, मनोज चौधरी, स्वप्नील भांडारकर व संदीप जाधव आदी उपस्थित होते. या मान्यवरांचा ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
भांडारकर म्हणाले, ‘‘तुमची स्पर्धा ही कोणत्याही बोर्डाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत किंवा दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसोबत नाही; तर तुमची स्पर्धा ही चीन, अमेरिका येथे शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेकडे लक्ष द्या. यश मिळवायचे असेल तर संयम ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्या परीक्षा द्यायच्या आहेत याची माहिती घेऊनच त्याचे क्लास तुम्ही सुरू करा. गणिताचा पेपर हातात आल्यावर कोणताही विद्यार्थी पहिल्यांदा प्रश्‍नपत्रिका वाचतो. त्यातील १० पैकी ८ प्रश्‍न येत असतील, तरी दोन अवघड प्रश्‍नांचा ताण विद्यार्थ्याला येतो आणि त्यातून काही चुका होतात. हे टाळायला हवे.’’

सूत्रे पाठ होणे महत्त्वाचे
‘‘गणित हा विषय नावडता मानला जातो. त्यामागे क्लिष्ट सूत्रे व सातत्याचा अभाव अढळून येतो. ही सूत्रे एकदा पाठ झाली, की कोणतेही गणित सोडविणे सोपे जाते. ही सूत्रे पाठ करण्यासाठी भांडारकर ॲकॅडमीने १०८० सूत्रांचे ‘ऱ्हिदमिक फॉर्म्युला’ तयार केले आहेत. असे सांगत भांडारकर यांनी स्वतः विद्यार्थी व पालकांकडून हे ‘फॉर्म्युला’ संगीताच्या तालावर म्हणून घेतले. यासोबतच ‘फॉर्म्युलाशीट टेक्निक’ व ‘रायटिंग प्रॅक्टिस कन्सेप्ट’ या तीनही गोष्टींवर आधारित ‘भांडारकर पॅटर्न’ कसा अभ्यासायचा याचीही त्यांनी माहिती दिली. यावेळी भांडारकर ॲकॅडमीमध्ये शिकणाऱ्या व दहावीत उत्तम गुणांनी पास झालेल्या विद्यार्थी व पालकांचा ॲकॅडमीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात करिअर समुपदेशक सुरेश कटारे यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. कोणतेही क्षेत्र निवडताना त्याची पूर्ण माहिती घ्या. आपला त्या क्षेत्रातील आवड, कल याकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याची इतर मुलांशी तुलना करू नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थी व पालकांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले; तर प्रस्तावना अर्चना भांडारकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com