भगवान बुद्ध, महावीर यांची शिकवणच तोडगा ः सबनीस

भगवान बुद्ध, महावीर यांची शिकवणच तोडगा ः सबनीस
Published on

पिंपरी, ता.१६ ः ‘‘आजच्या जागतिक परिस्थितीत संघर्ष, असहिष्णुता आणि मूल्यांचा ऱ्हास वाढत असताना भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांची शांतता, करुणा आणि अहिंसेची शिकवणच मानवजातीला योग्य दिशा देऊ शकतात. तीच आजच्या जागतिक परिस्थितीवरील तोडगा देखील आहे.’’, असे विचार ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथे कर्मयोगिनी महिला संस्था आयोजित आणि कवयित्री सीमा शिरीष गांधी लिखित ‘मी झाड व्हावे’ या काव्यसंग्रहाचे तसेच पुष्पाबाई गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘पत्र पुष्पांजली’ या पत्रलेखन स्पर्धेतील पत्रसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी ॲड. प्रार्थना सदावर्ते, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, नीलिमा फाटक, अरुण बोऱ्हाडे, दिनेश भोंबड उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. सीमा गांधी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या संयोजनात राज गांधी, नील गांधी, सलोनी गांधी, शिरीष गांधी आणि शांतीलाल गांधी यांनी परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल गांधी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com