गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर
‘एचपीव्ही’ने लस प्रभावी उपाय

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर ‘एचपीव्ही’ने लस प्रभावी उपाय

Published on

पिंपरी, ता. १६ ः गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक आहे. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लस योग्य वेळी घेणे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो, असे मत शहरातील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरात १४ वर्षे पूर्ण आणि १५ वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस मोफत दिली जात आहे. ९ जून २०११ ते ८ मार्च २०१२ या कालावधीत जन्मलेल्या मुली लसीकरणासाठी पात्र आहेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लस दिली जाते. याबाबत विभाग जनजागृती करीत आहे.

बालरोगतज्ज्ञ म्हणतात....
डॉ. रवींद्र कदम ः एचपीव्ही संसर्ग हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. त्यामुळे मुलींना योग्य वयात एचपीव्ही लसीकरण देणे आवश्यक आहे. ही लस सुरक्षित असून भविष्यात गंभीर आजारापासून संरक्षण देण्यात प्रभावी ठरते.

डॉ. जगदीश ढेकणे ः एचपीव्ही लसीकरणाबाबत काही गैरसमज समाजात आढळून येतात. मात्र, ही लस पूर्णपणे सुरक्षित असून योग्य वयात घेतल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होते. त्यामुळे पालकांनी मुलींच्या आरोग्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्यावे.

महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे ः १४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण दिल्यास भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ही लस वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित असून पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता पात्र मुलींना महापालिका रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आणावे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com