नैसर्गिक वायू प्रकल्पांना गती देणार

नैसर्गिक वायू प्रकल्पांना गती देणार

Published on

पिंपरी, ता. १६ ः महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मार्फत पिंपरी चिंचवडमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी महापालिकेकडून आवश्यक परवानग्या लवकरात लवकर देणे आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांना गती देण्याबाबत महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि एमएनजीएलचे प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित विविध कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने एमएनजीएलचे अधिकारी व महापौर रवी लांडगे यांच्यात बैठक झाली. मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यावसायिक संचालक शंकर करजगी, भाग्यश्री मंथलकर उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना एमएनजीएलच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांबाबत तातडीने कार्यवाही करून परवानगी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील नागरिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सुलभ नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध व्हावी, तसेच विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी महानगरपालिका व एमएनजीएल यांनी समन्वयातून काम करावे, असेही महापौर रवी लांडगे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com