थकबाकीदारांनी घेतला ‘अभय योजने’चा लाभ

थकबाकीदारांनी घेतला ‘अभय योजने’चा लाभ

Published on

पिंपरी, ता. २० ः पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘अभय योजना’ लागू केल्यापासून तब्बल २७ हजार ८४० मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेत कर भरला आहे. गेल्या २० दिवसांत या योजनेअंतर्गत ८० कोटींहून अधिक मालमत्ता कराची वसुली झाली आहे. ही योजना ३१ मार्च मध्यरात्री १२ पर्यंत सुरू राहणार असून, अद्याप ज्या मालमत्ताधारकांचा कर भरलेला नाही अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना १ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक करण्यात आले होते. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना १९ कोटी १५ लाखांची सवलत देण्यात आली आहे. तर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८३० कोटी पाच लाखांचा भरणा केला आहे.

‘‘महापालिकेच्या ‘अभय योजने’ला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून, विलंब शुल्कावर ९० टक्के सवलतीमुळे थकबाकीदारांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. मात्र, अजूनही काही मालमत्ताधारकांकडून थकीत कराचा भरणा झालेला नाही. अशा सर्वांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी थकीत रक्कम एकरकमी भरून या योजनेचा लाभ घ्यावा.’’
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com