मोकाट श्‍वानांबद्दल थेट अधिकाऱ्यांकडे करा तक्रार

मोकाट श्‍वानांबद्दल थेट अधिकाऱ्यांकडे करा तक्रार

Published on

पिंपरी, ता.२० : शहरातील मोकाट श्वानांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेने आठ प्रभाग कार्यालयनिहाय स्वतंत्र आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे तक्रारींचे वेळेत निरसन होण्यास मोठी मदत होईल, असा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला आहे.
मोकाट श्वानांनी केलेल्या हल्ल्याबाबतच्या तक्रारींचे निवारण प्रामुख्याने केंद्र स्तरावरून होत असल्याने कारवाईस वेळ लागत होता. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागावर रोष व्यक्त केला जात होता. हे लक्षात घेता प्रत्येक प्रभाग कार्यालयात स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
श्‍वानांबाबतच्या तक्रारी प्रभाग स्तरावरच निकाली काढल्या जातील, त्यामुळे नागरिकांनी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीनुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. महापालिकेमार्फत ही सर्व कामे भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार असल्याचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना मोकाट श्वानांच्या त्रासासंदर्भात तक्रारी मांडण्यासाठी प्रभाग कार्यालय स्तरावरच सक्षम यंत्रणा उभी केली जात आहे. त्यामुळे तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल, असा दावा अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केला.


समन्वय अधिकारी व संपर्क क्रमांक
मदनुरकर इरण्णा - ‘अ’ प्रभाग - ९१३०५८०७५१
शरद राठोड - ‘ब’ प्रभाग - ७७७६८१२०९०
राहुल गुलाले - ‘क’ प्रभाग - ७९७२६०९२७८
निरज हटवार - ‘ड’ प्रभाग - ७०२०३१४९४३
समीक्षा कुंभार - ‘इ’ प्रभाग - ९४२१६३२५३८
सुरज शिंदे - ‘फ’ प्रभाग - ९३७०४४३८१५
निशिगंधा कचवे - ‘ग’ प्रभाग - ९२८४८०११७७
सुनील कांबळे - ‘ह’ प्रभाग - ८८८८४४२०४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com