चिखलीत विद्यार्थिनीची आत्महत्या
पिंपरी, ता. २३ : वडिलांनी मोबाइल तपासल्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.
प्रतीक्षा अनिल गायकवाड (वय १६, रा. जाधववाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेली माहिती अशी, १७ मार्चला दुपारी प्रतीक्षा हिचा मोबाइल तिच्या वडिलांनी तपासला. या कारणावरून प्रतीक्षा हिने त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला उपचारासाठी तातडीने एका जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (ता. २३) पहाटे तिचा मृत्यू झाला. प्रतीक्षा ही जाधववाडी येथील महापालिकेच्या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

