

पिंपरी, ता. ३ : ‘‘निगडी प्राधिकरण येथील बीएसएनएल डक्टमधील मजूर मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,’’ अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने केली आहे. या प्रकरणी गुरुवारी पुकारलेल्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने बीएसएनएल अधिकारी आणि महासंघ यांच्यात निगडी पोलिस ठाण्यात चर्चा झाली.
या वेळी पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, पुणे बीएसएनएलचे महाव्यवस्थापक अतुल वाखले, उप महाव्यवस्थापक श्रीकांत नंदेश्वर, वीरेंद्र चौधरी यांच्यासह राजेश माने, राजू बिराजदार, माधुरी जलमूलवार आदी उपस्थित होते.
बीएसएनएल डक्टमध्ये मागील वर्षी तीन आणि आता दोघांचा मृत्यू झाला. यातील दोषी ठेकेदार, महापालिका आणि बीएसएनएल अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी महासंघाने केली. त्यावर, तीन मृतांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बीएसएनएल अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, तपास करून लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
या ठिकाणी दुसऱ्यांदा अपघात घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जबाबदारी निश्चित करण्याचे काम पोलिसांनी करावे. अशा घटना रोखण्यासाठी बीएसएनएल प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.