मेट्रो ३ साठी आता सप्टेंबरचा मुहूर्त

मेट्रो ३ साठी आता
सप्टेंबरचा मुहूर्त
Published on

पिंपरी, ता. २६ ः हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ३ सद्यःस्थितीत यार्डातच असून उद्‍घाटनाच्या तारखेसाठी प्रशासनाची धावाधाव होत आहे. या मार्गावर मेट्रो धावण्यासाठी सप्‍टेंबरच्या पंधरवड्याचा कालावधी नव्‍याने जाहीर झाला.
दरम्यान, चाचण्या, पूर्वतयारीसाठी या मार्गावर मेट्रो धावत असते. ती दृष्‍टीस पडत असताना इतके दिवस कोंडीत अडकलेले अनेकजण उत्‍सुकतेने पाहात होते. पण, तारखा लांबणीवर पडत असल्यामुळे आयटीयन्‍सनी प्रतीक्षा सोडून दिली आहे. या मार्गाच्या (माण ते बालेवाडी) पहिल्या टप्प्यातील १२ स्‍थानकांवरील सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) २३ जुलैला मंजुरी दिली. माण, हिंजवडी येथे एक अद्ययावत आगार उभारण्यात आले आहे. वापरापैकी एक-तृतीयांश वीज स्थानकांवरील रूफटॉप सोलर सिस्टीममधून निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

अशा बदलल्या तारखा
मार्च २०२५
सप्‍टेंबर २०२५
डिसेंबर २०२५
मार्च २०२६
मे २०२६
जून २०२६
१५ ऑगस्‍ट २०२६
५ ते १५ सप्‍टेंबर २०२६

मुदतवाढ
मूळ मुदत ः मार्च २०२५ (प्रकल्‍पासाठी ४० महिने अवधी)
पहिली मुदतवाढ ः मार्च २०२६
पुढील मुदतवाढ ः मार्च २०२७

---
मेट्रो मार्गावरील सेवा लवकरात लवकर सुरू करण्यास प्राधान्य आहे. त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवले होते. पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com