बोटांचे ठसे उमटेना अन् नोंदणीही होईना

बोटांचे ठसे उमटेना अन् नोंदणीही होईना
Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २६ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ‘एनसीएमसी’साठी (नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड) हाताच्या बोटांचे ठसेच उमटत नसल्याने नोंदणी होत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. शासनाने विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एक सप्टेंबरपासून हे कार्ड अनिवार्य केल्यास असे हजारो ज्येष्ठ नागरिक वंचित राहण्याची शक्यता आहे.
एसटीने प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी कार्ड प्रणाली लागू केली आहे. त्यासाठी मे. ईबिक्स टेक्नोलॉजिज आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार झाला आहे. त्यानुसार, सर्व बस स्थानकांवर एजंट नियुक्त केले असून स्थानकातच प्रक्रिया होत आहे. महा ई-सेवा केंद्र, विविध संस्थांनाही नोंदणीचे कंत्राट देण्यात आले आहे. सर्वच आगारांत पात्र प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत. केवळ आधार संलग्न बोटाच्या ठशांचा एकमेव पर्याय असल्यामुळे अनेक जणांची नोंदणी होऊ शकलेली नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक आगारांमध्ये हेलपाटे मारून मेटाकुटीस आले आहेत. अशी परिस्थिती कायम राहिल्यास शासनाने दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
---
एक सप्टेंबरपासून तिकीट दरातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. पण, अनेक ज्येष्ठ नागरिकांचे बोटाचे ठसे यंत्रावर उमटत नसल्यामुळे ते नोंदणी करू शकलेले नाहीत. त्यांच्या नोंदणीसाठी इतर पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत.
- भाऊसाहेब गायकवाड, प्रवासी, तळेगाव

बोटाचे ठसे उमटत नाहीत म्हणून एनसीएमसी कार्ड काढण्यापासून एकही पात्र प्रवासी वंचित राहणार नाही. यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देणार आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com