

पिंपरीत तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : पिंपरीतील विठ्ठलनगरमध्ये कोयत्याने वार करून एका तरुणाला जखमी करण्यात आले. याप्रकरणी विशाल सुभाष पौळ (रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रोशन रवींद्र कांबळे (रा. विठ्ठलनगर, पिंपरी) व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. आरोपी रोशनने फिर्यादीवर कोयत्याने वार केला. दुसरा आरोपी चाकू मारण्यासाठी अंगावर धावून आला. तिसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या डोळ्यावर मारून त्यांना जखमी केले.
--------------
कोयता बाळगल्याने दोघांना अटक
पिंपरी : बेकायदेशीररीत्या कोयता बाळगलेल्या दोघांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. देहूरोड येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसमोर ही कारवाई करण्यात आली. गणेश महाविरसिंग भुंबक (रा. झेंडेमळा, देहूगाव), वेदांत अशोक रोडे (रा. देहूगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला.
--------------
वाल्हेकरवाडीत ग्राहकाला मारहाण
पिंपरी : फळे खरेदी करताना झालेल्या किरकोळ वादातून वाल्हेकरवाडीत एका ग्राहकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ईश्वर अंगदराव कामाळे (रा. निगडी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सैफन मोहम्मद शेख (रा. बिजलीनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी हातगाडीवरील फळांचा भाव विचारत होते. त्यावेळी फळविक्रेत्याचा मुलगा तिथे आला. ‘अरे-तुरेची भाषा का करता,’ असे म्हणत त्याने वाद घातला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला हाताने तसेच डोक्यात दगडाने मारून जखमी केले आणि शिवीगाळ केली.
-----------
कापडाच्या दुकानातून रोकड चोरली
पिंपरी : येथील कापड बाजारातील ज्योती कलेक्शन दुकानातून अज्ञात महिलांनी ७१ हजार ८०० रुपयांची रोकड चोरली. याप्रकरणी कुमार भगवानदास रामचंदानी (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात महिला व एका मुलीवर गुन्हा दाखल केला.
-----------
मेफेड्रॉन प्रकरणी दोघे अटकेत
पिंपरी : मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगलेल्या दोघांना रावेत पोलिसांनी अटक केली. रावेत बीआरटी रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. चैतन्य श्याम कांबळे (रा. रावेत, मूळ नांदेड), कैलाश देवजी चौधरी (रा. रावेत, मूळ- राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. या भागात दोघेजण एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजार रुपये किमतीचे एमडी पोलिसांनी जप्त केले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.