

शेअर्स खरेदीच्या नावाखाली
शिक्षकाची फसवणूक
पिंपरी : शेअर्स खरेदी करण्याच्या नावाखाली एका शिक्षकाची १६ लाख २४ हजार ६०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना मारुंजी परिसरात घडली. या प्रकरणी मारुंजी येथील एका शिक्षकाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून शेअर्स खरेदीच्या नावाखाली त्यांच्या बँकेच्या खात्यातून विविध व्यवहारांद्वारे १६ लाख २४ हजार ६०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांची फसवणूक केली.
घरफोडीत ऐवज लंपास
पिंपरी : दरवाजा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील कपाट तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना भोसरीतील बालाजीनगर येथे घडली. याप्रकरणी एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. चोरटा घराचा मागील दरवाजा तोडून आत शिरला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरले.
मोबाईल हॅक करून नऊ लाख ९३ हजार लंपास
पिंपरी : मोबाईल हॅक करून कोणताही ओटीपी न घेता बँक खात्यातून परस्पर नऊ लाख ९३ हजार ३०५ रुपये काढून घेतले. हा प्रकार रावेत येथे घडला. या प्रकरणी कांताराम कृष्णा काशीद (रा. रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. काशीद यांनी एका पेट्रोल पंपावर २६५ रुपये ऑनलाइन भरले. त्यानंतर प्रवासात त्यांचा मोबाईल अचानक गरम होऊन त्याची स्क्रीन बंद झाली. काही वेळाने मोबाईल सुरू झाला. त्यांनतर एका हॉटेलमध्ये ६० रुपयांचे बिल ऑनलाइन भरताना व्यवहार अयशस्वी झाला. घरी जाऊन खात्याची तपासणी केली असता नऊ लाख ९३ हजार ३०५ रुपये परस्पर काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तडीपार गुंडाला तलवारसह अटक
पिंपरी : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या तडीपार गुंडाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त केली आहे. ही कारवाई पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या मोकळ्या मैदानात करण्यात आली. आकाश शंकर लष्करे (रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आकाश याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो शहरात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.