रिक्षा, टॅक्सीचालक मंडळाकडून सभासद नूतनीकरण सवलत

रिक्षा, टॅक्सीचालक मंडळाकडून सभासद नूतनीकरण सवलत
Published on: 

पिंपरी, ता. २९ ः धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या ज्या सभासदांच्या नूतनीकरणाचा कालावधी व वाढीव कालावधी संपलेला आहे, अशा सभासदांना ३१ डिसेंबरपर्यंत ३०० रुपयांमध्ये सभासदत्व नूतनीकरण करण्याची विशेष सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राज्यातील अनेक ऑटो रिक्षा संघटनांच्यावतीने काही वर्षांपासून कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी होत होती. १६ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार मंडळाची स्थापना करण्यात आली असून परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना राबविणे, केंद्र आणि राज्याच्या कल्याणकारी योजनांचा लाभ रिक्षाचालक आणि मालकांना देण्यात येत आहे. मात्र, महामंडळ स्थापन झाल्यानंतर सभासद नूतनीकरणाची सुविधाच उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक सभासदांचा नूतनीकरणाचा कालावधी व वाढीव ९० दिवसांचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने महामंडळाने आता नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

ज्या सभासदांचा नूतनीकरणाचा कालावधी व वाढीव कालावधी संपलेला आहे, अशा सभासदांना ३१ डिसेंबरपर्यंत ३०० रुपयांमध्ये सभासदत्व नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जे सभासद ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी नूतनीकरण करणार नाहीत. त्यांना १ जानेवारी २०२७ पासून नियमानुसार ८०० रुपये भरुन नवीन नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे सभासदांनी लवकरात लवकर नोंदणी नूतनीकरण करुन घ्यावे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड


नूतनीकरणासाठी वाढीव मुदत
रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्यासाठी https://ananddighekalyankarimandal.org/home/register या संकेतस्थळावर नोंदणी शुल्क भरून अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन नोंदणी व ओळखपत्र शुल्क ५०० रुपये व वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये असे एकूण ८०० रुपये आकारण्यात येत आहेत. त्यानंतर दरवर्षी सभासदत्व नूतनीकरणासाठी ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सभासदत्व नूतनीकरणाच्या देय तारखेपासून ९० दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर नूतनीकरण न केल्यास संबंधित सभासदाचे सभासदत्व समाप्त होणार आहे. त्या सभासदांना पुन्हा ८०० रुपये भरून नवीन सभासद म्हणून नोंदणी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.