कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘काव्यबहार’

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘काव्यबहार’

Published on

पिंपरी, ता. ३ : गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा सहावा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी झाला. यात काव्यवाचन, व्याख्यान आदींचा समावेश होता.
गुणवंत कामगार कल्याण मंडळातर्फे आकुर्डीत आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक तथा कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, प्रवचनकार नलिनी राजहंस, बिना इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आजम खान आदी उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, शब्दधन काव्यमंचचे सुरेश कंक, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे राज अहेरराव, विधीज्ज्ञ अंतरा देशपांडे, मंडळाचे विभागीय पदाधिकारी प्रकाश शिंदे, शंकर नाणेकर, संपत खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रदीप गांधलीकर, हेमंत जोशी, रेणुका हजारे, जयश्री श्रीखंडे, शोभा जोशी, नामदेव हुले, सतीश कांबळे, नामदेव हुले, सुलभा सत्तुरवार, राजेंद्र वाघ, राज अहेरराव, आण्णा जोगदंड, महेंद्र गायकवाड, अरुण कांबळे, कैलास भैरट, श्रीकांत कदम, प्रतिमा काळे, शामराव सरकाळे, सुभाष चटणे आदींनी कविता सादर केल्या. बाळासाहेब साळुंके यांनी प्रास्ताविक केले. तानाजी एकोंडे आणि सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. राजेश हजारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com