एनसीएमसी कार्डाची सक्ती तूर्तास शिथील

एनसीएमसी कार्डाची सक्ती तूर्तास शिथील
Published on: 

पिंपरी, ता. ५ ः ग्रामीण भागातील बहुतांश महिलांनी अद्याप नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) काढलेले नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने एनसीएमसी कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने एनसीएमसी स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारकडून महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी एक ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कार्ड काढण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, ग्रामीण भागातील कार्ड वितरणाची मर्यादित सुविधा आणि याबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे अनेक महिलांपर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही. विशेषतः ग्रामीण भागातील महिला प्रवाशांनी अद्याप एनसीएमसी कार्ड काढलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक महिला एसटीच्या तिकीट सवलतींपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, म्हणून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णय शनिवारपासून (ता. ७) ३१ डिसेंबरपर्यंत शिथील करण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच सवलतींचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या मुदतीचा उपयोग करून महिला प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.