

पिंपरी, ता. २३ : कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या मोतीलाल तालेरा इंग्लिश मीडियम प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल मोशी येथे योग दिन साजरा करण्यात आला. कॅम्प एज्युकेशनचे अध्यक्ष वालचंद डी. संचेती यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी योगतज्ज्ञ, साधक आणि शिक्षिका आंचल पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सीमा शादबर, समन्वयक, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा, विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.
गीता विद्यानिकेतन
पिंपरी ः अग्रवाल विद्याप्रसारक मंडळ संचालित गीता विद्यानिकेतन, सोमाटणे फाटा येथे योग दिन साजरा केला. याप्रसंगी योग शिक्षक राजाभाऊ दुर्गे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके दाखविली. योगाभ्यास कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. यावेळी नंदू भोगले यांनी योग दिनाचा इतिहास सांगितला. मुख्याध्यापिका रेणुका रत्नालिकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कुलकर्णी, शिक्षिका पूजा भेगडे, प्रिया तांबे, दीपाली पाटील, अनिता प्रसाद, अस्मिता पाटील, तुषार शेळके आदी उपस्थित होते.
गोदावरी हिंदी विद्यालय
पिंपरी : श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. या उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी योगाभ्यास केला. योग विद्या धामचे योगशिक्षक किशोर सुबकडे, राजेंद्र केंडे आणि भारती पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून योग करून घेतला. तसेच योगाचे महत्त्व आणि नियमित योगाभ्यासाचे लाभ याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य ब्रजेश त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना २१ जूनचे महत्त्व, योगशास्त्राचा उगम आणि महर्षी पतंजली यांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी पर्यवेक्षिका सरिता पांडे, पर्यवेक्षक राजेंद्र वर्मा आणि सांस्कृतिक विभागप्रमुख वंदना पांडे यांनी परिश्रम घेतले. क्रीडा शिक्षक राजकुमार माळी आणि दीपक पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.