पिंपरी चिंचवड शहरात मध्यम पाऊस

पिंपरी चिंचवड शहरात मध्यम पाऊस
Published on

पिंपरी, ता. २३ : शहर परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर, नागरिकांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
या पावसाने अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लागल्या. चौकांमध्ये कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊ लागला. ढगांनी शहर व्यापले आणि काही क्षणांतच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सायंकाळनंतर पिंपरी, निगडी, वाकड, काळेवाडी या भागात अर्धा ते पाऊण तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर भोसरी, दिघी, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव परिसरातही रिमझिम पाऊस झाला. तळवडे, काळेवाडी, पुणे मुंबई महामार्गावरील सेवा रस्ता आणि निगडी परिसरामध्ये काही काळ वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तापकीर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत, तसेच काळेवाडी फाटा आणि रहाटणी फाटा परिसरातही वाहतूक कोंडी झाली होती. निगडीतील उड्डाणपुलाखाली पाणी साचल्यामुळे रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com