

पिंपरी, ता. २६ : यशवंतनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या प्रलंबित पुनर्वसन व घरकुलासंदर्भातील समस्यांच्या निराकरणासाठी मुंबईच्या धर्तीवर ‘शासन आपल्या दारी’ संकल्पनेअंतर्गत विशेष समस्या निवारण शिबिर आयोजित करण्याची मागणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. याबाबत रहिवासी अमोल चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांना निवेदन दिले. प्रशासनाने थेट यशवंतनगर वस्तीत येऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करावा आणि पात्र झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी विशेष समस्या निवारण शिबिर आयोजित करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.