शालेय जगत
शालेय जगत

शालेय जगत शालेय जगत

Published on

शालेय जगत

भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत यश
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत प्रशालेतील इयत्ता आठवी मधील तृप्ती अंगद बिरादार या विद्यार्थिनीने १०० पैकी ९८ गुण मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले. दहावीमधील समृद्धी बाजीराव मेस्त्रीने १०० पैकी ९६ गुण मिळवून रौप्य पदक मिळविले. भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्रातर्फे (नेरूळ, नवी मुंबई) दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. नववीमधील ओंकार बालाजी दन्नेने १०० पैकी ९२ गुण मिळवून ब्राँझ पदक प्राप्त केले. शिक्षिका सुनंदा खेडेकर यांना उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परीक्षेचे नियोजन शिवाजी अंबिके, खंडू खेडकर, गंगाधर सोनवणे यांनी केले.

विज्ञान दिन साजरा
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत बालवर्ग तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त विविध प्रतिकृती, मॉडेल्स तयार करून सादरीकरण केले. हवेला दाब असतो, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज, वनस्पतींचे अवयव, पदार्थांच्या चवी, हवा जागा व्यापते, प्रकाशाचे विकेंद्रीकरण, मनोरंजनात्मक प्रयोग अशा विविध प्रयोगांचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून निष्कर्ष व अनुमान सांगितले. पाहुण्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. ज्येष्ठ वैज्ञानिक व विद्या भारती, पुणेचे अध्यक्ष डॉ. अशोक नगरकर उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे होते. त्यांनी तसेच मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी प्रदर्शनाचे उद्‍घाटन केले. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले. विज्ञान मंडळाच्या ज्योती निवंगुणे व रूपाली जाधव यांनी नियोजन केले.

मराठी राजभाषा दिन साजरा
मॉडर्न प्रशालेत मराठी राजभाषा दिन साजरा झाला. मुख्याध्यापक पांडुरंग, ज्येष्ठ शिक्षिका सुजाता कुलकर्णी, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पहिलीतील मयूर गटातील अमोहा तंबाखे, चौथीतील शिवनेरी गटातील शिवानी हागे व सानवी सावंत या विद्यार्थिनीनी सुंदर गाणे म्हटले. मुख्याध्यापक पांडुरंग मराडे यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगितले. अपर्णा घोलप यांनी सूत्रसंचालन केले. शालेय समिती अध्यक्ष मानसिंग साळुंखे, प्र-मुख्याध्यापक प्रमोद शिंदे व कार्याध्यक्ष गजानन एकबोटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
चिंचवडमधील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात नूतन शिक्षण संस्थेचे संस्थेचे सचिव चंद्रशेखर पाटील व मुख्याध्यापिका उज्वला चौधरी यांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्‍घाटन केले. ''बारा बलुतेदार'' प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. पूर्वीची समाजव्यवस्था व त्यातून तयार झालेले स्वयंपूर्ण खेडे याची संकल्पना त्यातून मांडण्यात आली. प्रदर्शनाला शाळेच्या परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बलुतेदारांची भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्याने त्यात जिवंतपणा आला. पालखी सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केलेली होती. मनीषा डोंगरदिवे यांनी मार्गदर्शन केले. तसेच हिंद-दि-चादर श्री गुरु तेजबहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम झाला. यानिमित्त उद्देशाने गीते, कविता, संतवाणी, भजन व चित्रकला स्पर्धा घेऊन श्री गुरू तेगबहादूर साहेबजी यांचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. याविषयी माहितीपटही दाखविण्यात आला.


कला स्पर्धा-वार्षिक क्रीडा महोत्सव
आकुर्डीतील श्री सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात शालांतर्गत कला स्पर्धा तसेच वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेत्यांना शालेय साहित्य, रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ गोविंद दाभाडे उपस्थित होते. मुख्याध्यापक राजू माळे उपस्थित होते. चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, भजन व आरती पाठांतर या स्पर्धांतील विजेत्यांना परीक्षेचे पॅड, रंगीत पेन्सिल बॉक्स, पट्टी-पेन्सिल-खोडरबर बॉक्स आदी तसेच प्रमाणपत्र देण्यात आली. देवांश पाटील, समृद्धी शिंदे, गौरव थापडे, पार्थ तीर्थकर या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. संगीत साथ प्रकाश कोळप यांनी दिली. यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवही झाला. आराध्या गायकवाड हिने सूत्रसंचालन केले. श्रद्धा सरवदे हिने प्रास्ताविक केले. माया आखाडे हिने आभार मानले. शिक्षकांतर्फे अश्विनी अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले.

पी.सी.एम.सी. पब्लिक, कुदळवाडी
पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी क्रमांक ८९ शाळेमध्ये आयएसओ मानांकन, विज्ञान प्रदर्शन उद्घाटन, जर्मन भाषा प्रमाणपत्र वितरण व मराठी भाषा दिन सोहळा पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कविता निकम, उपाध्यक्षा भाग्यश्री देसाई, आयएसओ प्रमुख लक्ष्मण साधू, तसेच परदेशी भाषा ऑनलाइन ॲप्लिकेशनचे संस्थापक व प्रकल्प प्रमुख शैलेश लेले यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक संपत पोटघन यांनी आयएसओ मानांकन हे केवळ एक प्रमाणपत्र नसून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची, शिस्तबद्ध व्यवस्थापनाची आणि सातत्यपूर्ण प्रगतीची साक्ष असल्‍याचे नमुद केले. जर्मन भाषा शिक्षक विनायक जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले. रोहिदास भांगले यांनी सूत्रसंचालन केले. मारुती खामकर यांनी आभार मानले.


पोदार शाळेत कला प्रदर्शन
वाकड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक कला महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी उद्‍घाटन केले. स्मिता पांगारे, स्वप्ना बालापुरे, दिनकर रणखांबे, तृप्ती कांबळे, ए. के. सिंग, मुख्याध्यापक ॲग्नेल कार्व्हालो उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा फॅशन डिझाईन रॅम्प वॉक आकर्षण होता. विविध कलात्मक संकल्पनांवर कलाकृती सादर करून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने रॅम्पवर चालत उपस्थितांची मने जिंकली. कला शाखेचे शिक्षक महेश पाटील, मृणाली माळी, मीरा भरमगुंडे, प्रिया सातपुते तसेच अनिता सिंग यांनी उपक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com