महापालिकेतील सेवानिवृत्त 
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

Published on

पिंपरी, ता. ३ ः नियत वयोमानानुसार आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या महापालिकेतील २६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शहर अभियंता मकरंद निकम, साहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, कार्यालयीन अधीक्षक अनिता बाविस्कर, मनीष जगताप, लेखापाल तानाजी सावंत, उपशिक्षक बापूराव गिरमे, मुख्य लिपिक चांगदेव खुने, सिस्टर इन्चार्ज जयश्री दाभाडे, नर्स मिडवाईफ सुजाता धवन, प्लंबर दिलीप गायकवाड, वायरमन रमेश थोरात, वीजतंत्री ज्ञानेश्वर ताम्हाणे, मुकादम राजेश कोटरवार, शांताराम तळपे, शिपाई कैलास वाघेरे, जितेंद्र मोरे, रखवालदार दत्तात्रय घुले, मजूर बाळू काळभोर, बलभीम कांबळे, पोपट भांगरे, आया सुमन तांबे, सफाई कामगार नयना कामठे, अनिल टाक, सुनीता शिंदे, गणेश भंडारी, गटरकुली धोंडीबा गायकवाड यांचा समावेश आहे. उपआयुक्त संदीप खोत, सहशहर अभियंता सुनील भागवानी उपस्थित होते. मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी प्रास्ताविक केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com