

पिंपरी, ता. १० ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाने शुक्रवारी (ता. १०) रिक्षा व दुचाकी या प्रवासी वाहनांमधून अनधिकृतपणे मालवाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दोन लाख १५ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६६/१९२ नुसार परिवहन वाहनांचा वापर संबधित परवाना व त्यातील अटींनुसार करणे आवश्यक आहे. मात्र शहरात पोर्टर, ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या विविध ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून रिक्षा व दुचाकी या प्रवासी वाहनांमधून मालाची वाहतूक करण्यात येत आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने पिंपरी चिंचवड आरटीओने शुक्रवारी विशेष तपासणी मोहिम राबवली. या तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर मोटार वाहन कायदा व संबधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ऑनलाईन बुकिंग ॲपद्वारे सेवा पुरविणाऱ्या संबधित कंपन्यांना नियमांचे पालन करण्याबाबत व प्रवासी वाहनांमधून अनधिकृत मालवाहतूक न करण्याबाबत नोटीस बजवण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अनधिकृतपणे माल वाहतूकीसाठी वापर करुन नये.
रिक्षा व दुचाकी या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा वापर परवान्यात नमूद केलेल्या उद्देशानुसार व परवान्याच्या अटींच्या अधीन राहूनच करावा. परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर यापुढेही नियमितपणे तपासणी व कारवाई सुरू राहणार आहे.
- राहूल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.