

पिंपरी, ता. १३ : ‘‘शहरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण, योग्य विल्हेवाट आणि ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही राबविण्यात येईल,’’ अशी भूमिका महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता शेखर गुरव, आसरा फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना मोरे, कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्प व्यवस्थापक अमृता बहुलेकर, आयपीसीएचे प्रतिनिधी दत्ता हेंद्रे, वैभव नसुरडे, आशिष कुंभलकर, महापालिका कर्मचारी आणि प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या वतीने चिंचवड येथील मुख्य कार्यालयात ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले.
या उपक्रमांतर्गत काच, रद्दी कागद, धातू, स्वच्छ पॉलिथिन, प्लॅस्टिक आणि ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीसाठी ऑरगॅनिक कंपोस्ट ड्रम ठेवण्यात आला आहे. यामुळे कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि पुनर्वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.
युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण
अतिरिक्त आयुक्तांनी चिंचवड येथील कौशल्यम लाइटहाऊस प्रकल्पालाही भेट देऊन प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हिडिओ एडिटिंग यासारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.