

पिंपरी, ता. ६ : आर्थिक अडचणीतील नागरिकांना ‘कर्ज मिळवून देतो’, ‘सरकारी नोकरी लावून देतो’, अशा आमिषांना भुलवून फसवणूक करण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. बेरोजगारी, वाढती स्पर्धा आणि तातडीच्या पैशाच्या गरजांमुळे अनेकजण अशा जाळ्यात अडकत आहेत. धोकेबाज आणि ठगांना फसून हजारोंपासून लाखो रुपयांपर्यंतची रक्कम गमावत आहेत. विशेषतः तरुण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबे ही त्यांना मुख्य लक्ष्य ठरत आहेत.
अशी होते फसवणूक
- समाज माध्यमे, बनावट जॉब पोर्टल्स, ओळखीतील व्यक्तींचे संदर्भ, कॉल किंवा मेसेजद्वारे संपर्क
- आरोपी स्वतःला ‘सरकारी अधिकारी’, ‘बँक एजंट’ किंवा ‘राजकीय नेत्यांच्या ओळखीचा माणूस’ म्हणून सादर करतो
- खोटे ओळखपत्र, व्हिजिटिंग कार्ड, बनावट वेबसाईट्स दाखवतात
- आधीच्या यशस्वी उमेदवारांची बनावट उदाहरणे देणे
- नोकरीची १०० टक्के हमी, कर्ज मंजुरी, सरळ पोस्टिंग, अशा अवास्तव आश्वासनांचा पाऊस
- प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, अशा विविध कारणांनी पैसे उकळणे
- बनावट नियुक्तीपत्र / कर्ज मंजुरी पत्र देत अखेरीस फोन बंद, ऑफिस गायब किंवा संपर्क बंद
प्रमुख कारणे काय ?
- बेरोजगारी, वाढती स्पर्धा, सरकारी नोकरीची प्रचंड मागणी
- आर्थिक अडचणी, तातडीने कर्जाची गरज
- कमी वेळात काम होण्याची अपेक्षा
- अधिकृत प्रक्रियेची माहिती नसणे
- फसवणुकीनंतर तक्रार देण्यास टाळाटाळ
काय काळजी घ्यावी ?
- सरकारी नोकरीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट, जाहिराती आणि परीक्षा प्रक्रियांवरच विश्वास ठेवा
- कोणतीही रक्कम देण्याआधी संबंधित व्यक्ती, संस्था आणि कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करा
- रोख व्यवहार टाळणे, आधार, पॅन, बँक डिटेल्स कोणालाही सहज न देणे
- अनोळखी लिंक, अॅप किंवा वेबसाईटवर माहिती भरू नका
- फसवणूक झाल्यास त्वरीत पोलिस ठाणे किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा
सरकारी नोकरी किंवा कर्ज मिळवून देण्यासाठी कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नसते. अशा प्रकारांना बळी पडू नये आणि संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, चिंचवड
घटना
३ एप्रिल
- समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक आणि कारागृह पोलिस पदावर नोकरीच्या आमिषाने पिंपरीत तिघांची ४३ लाखांची फसवणूक
२९ मार्च
शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने भोसरीत एकाला पाच लाख ४६ हजार ५०० रुपयांना गंडा
२८ मार्च
मोठ्या रकमेच्या कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून पिंपरीत एका व्यावसायिकाची २ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.