

पिंपरी, ता. ६ : निगडी प्राधिकरणातील भरतमुनी रंगघन सभागृहात ‘रुद्रंग’ आयोजित अनुसंधान कला संस्थेचा उद्घाटन समारंभ पार पडला. यानिमित्त ज्ञानेश्वर माउलींच्या भक्ती आणि प्रेमधर्माचा जागर करणारा ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या महानाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे व नगरसेविका शैलजा मोरे, ‘रुद्रंग’चे अध्यक्ष रमेश वाकनीस, वाशी येथील रमेश शिंदे उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात ‘ताटी उघडा’चे लेखक, कवी, दिग्दर्शक सुरेश कोकीळ यांची मुलाखत श्रीकांत चौगुले व संदीप साकोरे यांनी घेतली. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी व उज्ज्वला केळकर यांनी केले. किशोरी व नंदीन सरीन यांनी गायलेल्या गणेशस्तवन, नांदीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शशीधर बडवे, नागेश जोशी, माधुरी ओक, बाळासाहेब विभूते, अरुणा वाकनीस, सागर यादव, भूषण कोकीळ, अनिष कोकीळ यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.