

पिंपरी, ता. ७ : क्षणिक राग, वैयक्तिक खुन्नस आणि सूडभावनेतून एखाद्यावर प्राणघातक हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार घडत आहेत. आळंदीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणाने तर खळबळ उडाली. यासह इतरही घटनांमध्ये मारहाण, चाकू हल्ले, जीवघेणे हल्ले अशा घटना घडत आहेत.
कारणे
- भावनांवर नियंत्रण नसणे
- बोललेल्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढणे.
- संवादाचा अभाव
- मानसिक तणाव, नैराश्य
- सोशल मीडियामुळे तुलना, अपमान
- कुटुंबातील पाठिंब्यांचा अभाव
- चुकीची संगत
- योग्य मार्गदर्शन / समुपदेशन न मिळणे
- अपयश आणि ताण सहन करण्याची कमी झालेली क्षमता
- दारू व अमली पदार्थांचा वाढता प्रभाव
- हिंसक वर्तनावर नियंत्रण नसणे
- पालकांचे दुर्लक्ष
--------------------
उपाय
- रागावर नियंत्रण मिळविण्याची क्षमता आत्मसात करणे
- वेळेवर भावना व्यक्त करणे
- समुपदेशकाची मदत घेणे
- कुटुंब व मित्रांनी समोरील व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे
- शाळा/महाविद्यालयात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे
- राग वाढत असल्यास क्षणभर थांबून विचार करायची सवय लावणे
- व्यसनमुक्ती मोहिमा
- कडक व जलद न्यायप्रक्रिया
- डिजिटल साक्षरता
--------------------
* का घडतात घटना
- मित्रांतील किंवा ओळखीतील किरकोळ भांडण
- आर्थिक व्यवहार किंवा उधारी
- प्रेमसंबंध किंवा वैयक्तिक मतभेद
- जुना वाद
- रस्त्यावर वाहनांची धडक किंवा ओव्हरटेकवरून वाद
======================
काही घटना
८ मार्च
दापोडी ः दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून चौघांकडून एकाला मारहाण
१३ मार्च
सुस ः रस्त्यावरील गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
२१ मार्च
दापोडी ः जुन्या वादातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला
२६ मार्च
पिंपरीगाव ः जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार
२७ मार्च
चाकण ः बसमधून थुंकल्याच्या रागातून चौघांकडून तरुणाला बेदम मारहाण
२९ मार्च
चिंचवड ः भांडण झाल्यानंतर एका कामगाराने दुसऱ्या मजल्यावरून ढकलल्याने दुसऱ्या कामगाराचा मृत्यू
२९ मार्च
चिखली ः पैसे देण्यास नकार दिल्याने मैत्रिणीला दगडाने मारहाण
३० मार्च
वाकड ः खुन्नसने बघितल्यावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण
२ एप्रिल
चिंचवड ः सिगारेट देण्यास नकार दिल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला
२ एप्रिल
आळंदी ः राग व खुन्नसमधून ज्येष्ठ महिलेसह सहा वर्षीय मुलीची हत्या
४ एप्रिल
गहुंजे ः दारूचे पैसे नंतर देतो म्हटल्याने तरुणाला बेदम मारहाण
४ एप्रिल
पिंपरी ः काम मागितल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
-----------
छोट्या कारणांवरून निर्माण होणारा राग आणि खुन्नसचे अनेकदा गंभीर परिणाम होतात. संवादाचा अभाव, भावनांचे दडपण आणि क्षणिक आवेगामुळे काही व्यक्ती टोकाचे निर्णय घेताना दिसतात. राग ही नैसर्गिक भावना आहे. परंतु, त्याचे व्यवस्थापन शिकणे अत्यंत गरजेचे आहे. जर व्यक्ती वेळेवर आपल्या भावना व्यक्त करू शकली, समजून घेणारा कोणी असेल, आणि संवाद खुला असेल, तर अनेक टोकाचे प्रसंग टाळता येऊ शकतात. त्यामुळे ‘बोलणे’ आणि ‘ऐकून घेणे’ ही दोन्ही कौशल्ये विकसित करणे आजच्या काळाची गरज आहे
- प्रदीप सातपुते, समुपदेशक
================
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.