

पिंपरी, ता.९ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तपेढीत विविध रक्तघटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजू रुग्णांना सातत्याने रक्तपुरवठा करण्यात येत आहे. सध्या दररोज सरासरी ६० ते ७० रक्तघटकांच्या बॅग्जचे वितरण विविध रुग्णालयांना व गरजू रुग्णांना करण्यात येत आहे.
सद्यस्थितीनुसार रक्तपेढीत लाल रक्तपेशींच्या २१५ बॅग्ज, प्लाझ्माच्या २१३ बॅग्ज, प्लेटलेट्सच्या ४ बॅग्ज तसेच क्रायो प्रेसिपिटेटच्या १५ बॅग्ज असा एकूण ४५० रक्तघटकांचा साठा उपलब्ध आहे. उर्वरित दिवसांमध्ये शहरात सहा ते सात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून त्यामधून अंदाजे ६०० रक्तपिशव्यांचे संकलन अपेक्षित आहे. याशिवाय दररोज सरासरी ८ ते १० रक्तदाते रक्तकेंद्रात येऊन रक्तदान करत आहेत. आवश्यकतेनुसार अधिक रक्तदात्यांना आवाहन करून तातडीने रक्तसंकलन वाढविण्याची तयारीही रक्तपेढीने ठेवली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आगामी रक्तदान शिबिरांमधून रक्तसंकलन वाढवून संभाव्य मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आतापर्यंत एकाही रुग्णाला रक्ताअभावी परत जावे लागलेले नाही, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब असून नागरिकांनीही नियमित रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा.’
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.