आकुर्डीत ‘सितारे झेप के’ स्नेहसंमेलन उत्साहात

आकुर्डीत ‘सितारे झेप के’ स्नेहसंमेलन उत्साहात
Published on

निगडी, ता.११ ः झेप पुनर्वसन केंद्राच्यावतीने ‘सितारे झेप के’ हे विशेष मुलांचे १९ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले.
नृत्य, गायन, वादन आणि नाट्य सादरीकरणांद्वारे सुमारे ११० मुलांनी कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले.
आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात हे स्नेहसंमेलन झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, उद्योजक मनोज नाईक, संस्थेच्या विश्वस्त-अध्यक्षा वर्षा तावडे, सचिव समीर गाजरे, सीमा कांबळे, भूषण जोशी, प्रभाकर पाटकर, नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.
संकर्षण कऱ्हाडे म्हणाले, ‘‘मी आजपर्यंत अनेक नाट्यप्रयोग केले. मात्र, या मुलांचे सादरीकरण पाहून मी भारावून गेलो. त्यांच्या अभिनयातून अजूनही मला बरेच काही शिकण्यासारखे आहे.’’
नाईक यांनी झेपच्या कार्याचे मनापासून कौतुक करत संस्थेला नेहमीच माझे सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
या स्नेहसंमेलनात विशेष मुलांनी सादर केलेला संगीतबद्ध ऑर्केस्ट्रा तसेच ‘वीर दौडले सात’ या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. नाटकातील संवादांवरील मुलांचे प्रभुत्व विशेष उल्लेखनीय ठरले. काही पालकांनीही मनोगत व्यक्त करत संस्थेबरोबरचे आपले सकारात्मक अनुभव यावेळी मांडले. शिक्षकांच्या गौरवाचा कार्यक्रमही पार पडला. संस्थेच्या संस्थापिका नेत्रा पाटकर यांच्या प्रास्ताविक केले. समन्वयक तृप्ती अकुलवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com