निर्माल्याचा व्हावा प्रभावी पुनर्वापर

निर्माल्याचा व्हावा प्रभावी पुनर्वापर
Published on

पिंपरी, ता. २० ः शहरात दररोज सरासरी दीड हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यात गणेशोत्सव काळातील निर्माल्याची भर पडत आहे. गेल्यावर्षी उत्सवात तब्बल २५६ मेट्रिक टन निर्माल्य संकलित झाले होते. त्यापैकी केवळ पाचशे किलो निर्माल्यापासून धूप व अगरबत्ती निर्माण केले होते. यावर्षी त्याचे प्रमाण वाढवायला हवे. तसेच, सेंद्रीय खतासाठी निर्माल्याचा वापर व्हायला हवा, यामुळे मोशी डेपोवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
मोशी डेपोतील दुर्घटनेमुळे कचऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ओला-सुका कचरा, निर्माल्य, जैविक कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल आणि पॅकिंग साहित्य आदींचा अंतिम भार मोशी डेपोवरच येत आहे. निर्माल्याचे स्वतंत्र संकलन व कंपोस्टिंग आवश्यक आहे. तसेच, दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी निश्चित केलेल्या जागांबाबत निर्णय होऊन केंद्रांची कार्यवाही व्हायला हवी. यात ओला-सुका कचरा वर्गीकरण, बायोगॅस-बायोफ्युएल व प्लॅस्टिक प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहेत. या केंद्रांची अंतिम क्षमता, मंजुरी आणि कामाची मुदत अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे कचरा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो.

‘‘गणेशोत्सवातील निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे वर्गीकरण व शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोशी डेपोवरील भार कमी करण्यासाठी शहरातील काही भागांमध्ये विकेंद्रित कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी जागा प्रस्तावित केल्या आहेत. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. जागांची तांत्रिक व्यवहार्यता, पर्यावरणीय बाबी आणि स्थानिक गरजा तपासून अंतिम आराखडा निश्चित केला जाईल.
- कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

दृष्टिक्षेपात कचऱ्याचे गणित (मेट्रिक टनामध्ये)
दैनंदिन सरासरी कचरा ः १४०० ते १५००
२०२५ गणेशोत्सवातील निर्माल्य ः २५६
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com