मिक्सर ट्रकखाली सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू

मिक्सर ट्रकखाली सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू
Published on

पिंपरी, ता. १२ : ट्रकच्या चाकाखाली सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवड परिसरातील एसकेएफ कंपनीजवळ घडली. हा ट्रकचालक मोबाइलवर बोलत होता, त्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
फारूख उर्फ रेहान तांबोळी (वय १५, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील शकील तांबोळी यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मिक्सर ट्रकचालक निवृत्ती गिरी (वय ३९, रा. पद्मावती रस्ता, आळंदी) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
फारूख हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो सायकलवरून घरी जात होता. त्यावेळी खंडोबा माळ चौकातून चापेकर चौकाकडे जाणाऱ्या मिक्सर ट्रकने एसकेएफ कंपनीजवळील रस्त्यावर फारूखच्या सायकलला धडक दिली. यात तो ट्रकखाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस आयुक्तालयापासून काही अंतरावरच ही घटना घडली, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांनी सांगितले.

अवजड वाहने सुसाट
शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ निश्चित आहे. तरीही, अनेक चालक निर्बंध झुगारून वाहने सुसाट चालवत आहेत. यामुळे अपघाती मृत्यू वाढत आहेत. हे पाहता पोलिसांचे नियम केवळ कागदोपत्रीच आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मूळ गावी अंत्यसंस्कार
तांबोळी कुटुंबाचे मूळ गाव चिकुर्डी, ता. वाळवा जि. सांगली आहे. कामानिमित्त ते चिंचवडेनगर येथे राहत होते. फारूखचे वडील खासगी कंपनीत नोकरीला असून आई रिजवाना गृहिणी आहे. त्याला जोहान नावाचा दोन वर्षांचा लहान भाऊ आहे. फारूखची उत्तरीय तपासणी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात झाल्यानंतर रात्री उशिरा मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

PNE26W03226

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com