‘स्वागतम ई-प्रवेश’ला प्रतिसाद; ५१ हजार अपॉइंटमेंट्सची नोंद

‘स्वागतम ई-प्रवेश’ला प्रतिसाद; ५१ हजार अपॉइंटमेंट्सची नोंद
Published on

पिंपरी, ता. १३ : महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत नागरिकांचा प्रवेश सुलभ, सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी सुरू केलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एक मे ते सात सप्टेंबरदरम्यान या प्रणालीतून ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद झाली. त्यापैकी ३९ हजार ४४३ नागरिकांनी आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून भेट दिली असून, १४ हजार ७२३ नागरिकांनी लॉग-इन खाती तयार केली आहेत. बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागासाठी सर्वाधिक नऊ हजार ३६१ नोंदी झाल्या आहेत. त्यापाठोपाठ नगररचना विभागासाठी चार हजार ३११, स्थापत्य विभागासाठी तीन हजार ७९२, वैद्यकीय विभागासाठी दोन हजार ४०३ आणि महापौर कार्यालयासाठी दोन हजार ३०६ नागरिकांनी नोंदणी केली. आरोग्य, पर्यावरण, पाणीपुरवठा, आयुक्त व लेखा विभागांनाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या.
नागरिकांना संकेतस्थळावरील ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ लिंकवरून खाते तयार करून विभाग व भेटीची तारीख निवडता येते. पुढील सात दिवसांतील उपलब्ध तारखांसाठी नोंदणी करता येते. क्यूआर कोड आणि ओटीपी पडताळणीद्वारे प्रवेश दिला जातो. त्यामुळे प्रतीक्षा वेळ कमी होऊन प्रवेश व्यवस्थेत शिस्त व सुरक्षितता वाढल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com