

पिंपरी, ता. १२ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या वाकड, काळेवाडी, रावेत, हिंजवडी, बावधन या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील १९ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये तीन महिने ते दोन वर्षे असा प्रत्येकाचा तडीपारीचा कालावधी आहे.
रोहन नानासाहेब शेवते (रा. लक्ष्मीबाई कॉलनी, ताथवडे), विद्या अनिल राठोड (रा. अष्टविनायक कॉलनी, कलाटेनगर, वाकड), रेश्मा मिथुन आटोटे (रा. बालाजीनगर, भोसरी), पंकज संतोष चोथे (रा. जगतापनगर, थेरगाव), आदित्य बाबासाहेब शेंडगे (रा. पिंपळे सौदागर), आशिष ऊर्फ दादल्या एकनाथ शेटे (रा. नखातेवस्ती, रहाटणी), श्रवण विजय माचरे (रा. डांगे चौक, थेरगाव), सुशील बाळू शिंदे (रा. नढेनगर, काळेवाडी), ऋषिकेश हरी आटोळे (रा. बेलठीकानगर, थेरगाव), अमिन खाजाभाई शेख (रा. भोंडवे वस्ती, रावेत), नितीन पांडुरंग गव्हाळे, अशोक सदाशिव गायकवाड (दोघेही रा. रमाबाईनगर, रावेत), ज्योती नटवर ऊर्फ नटरू मारवाडी (रा. रावेत), अक्षय विलास नांगरे (रा. सातव वस्ती, लवळे), एडविन अँथोनी फर्नांडिस (रा. एक्झरबीया सोसायटी, नेरे दत्तवाडी), किरणदेवी मनोज नट (रा. महाळुंगे, ता. मुळशी, मूळ-राजस्थान), संदीप बबन भुंडे (रा. पाटीलनगर, बावधन), नितीन रामेश्वर भारती (रा. बालाजीनगर, पिरंगुट), सम्राट भागवत शिंदे (रा. अर्जुननगर, म्हाळुंगे, ता. मुळशी).
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.