ठेकेदारावर अखेर कारवाईचा बडगा

ठेकेदारावर अखेर कारवाईचा बडगा
Published on

पिंपरी, ता. १२ : पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम मुदतीत पूर्ण न केल्याने महापालिकेने ठेकेदारावर कारवाई केली आहे. एक ऑगस्टपासून भाववाढीचा निर्देशांक गोठविण्यात आला असून, एक सप्टेंबरपासून ठेकेदारास दररोज एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. काम पूर्ण होईपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.
पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव, पिंपळे सौदागर व रहाटणी परिसराला जोडणारा हा पूल संरक्षण विभागाच्या जागेत उभारला जात आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा लोहमार्गावरील क्रॉसिंगमुळे होणारा अडथळा कमी होण्यासह अवजड वाहनांची ये-जा सुलभ होणार आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गापासून डेअरी फार्म रस्त्यावर १,२९० मीटर लांबीचा व १७.२० मीटर रुंदीचा पूल उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी ६५ कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
टी ॲण्ड टी इन्फ्रा. लि. कंपनीने ३१ मार्च २०२३ रोजी कामास सुरुवात केली. झाडे काढणे आणि रेल्वे विभागाच्या विविध परवानग्यांमध्ये झालेल्या विलंबामुळे काम रखडले. दोन वर्षांच्या मुदतीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेने तीन वेळा मिळून १७ महिन्यांची मुदतवाढ दिली तरीही ३१ जुलै २०२६ पर्यंत काम पूर्ण झाले नाही. सध्या पुलाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

तीन वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्याने कारवाई करण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून भाववाढीचा निर्देशांक गोठविला असून, एक सप्टेंबरपासून दररोज एक हजार रुपये दंड आकारला जात आहे.
- विजय भोजने, कार्यकारी अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com