

सोमाटणे, ता. १७ ः सोमाटणे येथील सर्व गणेश मंडळांनी केवळ विद्युत रोषणाई करून सजावटीवरील बहुतांश खर्च वाचविला आहे. या पैशाचा उपयोग सामाजिक उपक्रम व प्रदुषण कमी करण्यासाठी होत असल्याची माहिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
देवीआई मित्र मंडळाने पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती उपक्रम सुरू केला. प्रदुषण टाळण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी गावातील मुर्ती व निर्माल्य जमा करून त्याचा योग्य उपयोग करण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी मंडळाने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. अध्यक्ष राहुल निघोजकर आणि पदाधिकारी नियोजन करीत आहेत. शिवतेज मित्र मंडळाने अध्यक्ष समर्थ मुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा घेण्यात येत आहेत. ज्ञानराज मित्र मंडळाने अध्यक्ष राजू धारवाडकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, प्रदूषणाविरुद्ध जनजागृती उपक्रमांवर भर दिला आहे.
ओंकार मित्र मंडळाने महिला व विद्यार्थ्यांच्या विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अध्यक्ष पंकज माळी पदाधिकाऱ्यांसह नियोजन करीत आहेत. झंकार मित्र मंडळाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी विविध स्पर्धा घेतल्या. शेवटच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल. गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे, हा यामागील उद्देश आहे. अध्यक्ष अक्षय मुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी नियोजन करीत आहेत.
हनुमान मित्र मंडळाने गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षण व वैद्यकीय खर्चासाठी मदत करण्याचा संकल्प सोडला आहे. अध्यक्ष अमर बनकर यांनी संयोजन केले आहे. गणेश मित्र मंडळाने अध्यक्ष पंकज बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे.
-----------------------
फोटो
50503
50505
50506
50507
50508
50510
50511
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.