तुकाराम बीजनिमित्त पीएमपीच्या जादा बस
पिंपरी, ता. ४ : तुकाराम बीजनिमित्त ५ व ६ मार्च या दोन दिवशी देहू मार्गावर १२५ बस सोडण्यात येणार आहेत. यामुळे राज्यभरातून पुण्यात आलेल्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
भाविकांना देहू येथे जाण्यासाठी स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, देहूरोड स्टेशन आणि आळंदी या ठिकाणांहून ५ व ६ मार्चदरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सकाळ आणि दुपार या दोन्ही सत्रांमध्ये तीन दिवसांत एकूण १२५ बस धावणार आहेत.
देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी झेंडे मळ्याजवळ लष्करातील मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. तेथून जादा बसेस सुटणार आहेत. देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्यासाठी देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून ३४ बस सोडण्यात येतील.
तुकाराम बीजनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून देहूगाव आणि आळंदीसाठी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
- यशवंत हिंगे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
येथून सुटणार बस
१. स्वारगेट ते देहूगाव - ५४
२. मनपा भवन ते देहूगाव - ११२
३. पुणे स्टेशन ते देहूगाव - ६२
४. निगडी ते देहूगाव - १५
५. देहूरोड स्टेशन ते देहूगाव - ४
६. आळंदी ते देहूगाव - ३५
आळंदीसाठी येथून सुटणार बस
हडपसर ते आळंदी - १२
पुणे स्टेशन ते आळंदी - ४
मनपा भवन ते आळंदी - ११

