पवनमावळात ज्वारी काढणीला वेग; मजूरांना रोजगार

पवनमावळात ज्वारी काढणीला वेग; मजूरांना रोजगार

Published on

सोमाटणे, ता. ४ : पवनमावळ परिसरात ज्वारी काढणीच्या कामांना सुरुवात झाली असून त्यामुळे मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ज्वारी काढणीची कामे मिळाल्याने मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पवनमावळातील शेतकरी दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला ज्वारी काढणीला प्रारंभ करतात. मात्र यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने सोमाटणे, शिरगाव, गोडुंब्रे, दारुंब्रे, गहुंजे, साळुंब्रे, सांगवडे, चांदखेड, पाचाणे, पुसाणे, आढले, कुसगाव आदी गावांतील शेतकऱ्यांना तब्बल एक महिना उशिराने पेरण्या कराव्या लागल्या. परिणामी ज्वारी काढणीही उशिरा सुरू झाली.
सध्या शेतकऱ्यांनी काढणीच्या कामांना वेग दिला आहे. मागील काही दिवसांपासून शेतीची इतर कामे नसल्याने मजूरांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत होती. कामाअभावी काहीजण शिकारीकडे वळले होते. मात्र आता ज्वारी काढणीमुळे त्यांना नियमित काम उपलब्ध झाले आहे.
सध्या मजूरांना दररोज सुमारे चारशे रुपये रोजंदारी तसेच दोन वेळचे जेवण मिळत असून त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळाले आहे.

PNE26W00531

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com