डिजिटल सुरक्षा अधिक सोपी, आणखी बळकट

डिजिटल सुरक्षा अधिक सोपी, आणखी बळकट

Published on

पिंपरी, ता. ४ : जगभरात सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. ‘पासवर्ड’ पुरेसा सुरक्षित नसणे, तो ‘सेव्ह’ ठेवणे, अनोळखी व्यक्तींना सांगणे यामुळे बहुतांश गुन्हे होतात. मात्र, पिंपरी चिंचवडमधील निखिलेश वाणी या आयटी अभियंत्याने या समस्येवर उपाय म्हणून ‘बाइटसील’ हे नावीन्यपूर्ण बायोमेट्रिक सायबर सुरक्षा उपकरण विकसित केले आहे. यामुळे डिजिटल सुरक्षा आता अधिक सोपी व बळकट झाली आहे. या उपकरणाची नोंद विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या निधी कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध झालेल्या ७५ स्टार्ट अपच्या यादीत करण्यात आली आहे.
डिजिटल युगात ई-मेल, बॅंक अकाउंट, ई कॉमर्स बेवसाइट, सोशल मीडिया अकाउंट हे सगळे सुरक्षित ठेवण्यासाठी ‘पासवर्ड’ अनिवार्य आहे. मात्र, हे विविध ‘पासवर्ड’ लक्षात ठेवणे कठीण जातात. त्यामुळे सगळीकडे एकच ‘पासवर्ड’ वापरला जातो किंवा सोपा ‘पासवर्ड’ ठेवला जातो. ज्यामुळे सायबर फसवणुकीचा धोका वाढतो. त्यामुळे हॅकिंगपासून आपले अकाउंट वाचवणे हे एक मोठे आव्हान झाले आहे. अशातच ‘बाइटसील’ या उपकरणामुळे केवळ अंगठ्याच्या ठश्‍याने आपले अकाउंट सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

असे आहे ‘बाइटसील’ उपकरण
तळहाताच्या आकाराचे असणारे हे उपकरण अद्ययावत बायोमेट्रिक उपकरण आहे. ते मोबाइलला जोडल्यास आपले पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहण्याची गरज राहत नाही. आपल्या अंगठ्याचा ठसा हाच ‘पासवर्ड’सारखा काम करतो. वापरकर्त्यांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये नाही, तर या सुरक्षित उपकरणात साठवली जाते. या उपकरणावर अंगठ्याचा ठसा उमटवल्यानंतरच मोबाइलमधल्या ॲपचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या बोटांचे ठसे कोणत्याही क्लाउडवर किंवा बाहेरील सर्व्हरवर अपलोड केले जात नाहीत; ते केवळ या उपकरणातच सुरक्षित राहतात. त्यामुळे तुमच्या पासवर्डला अजून एक सुरक्षेचे कवच मिळते व मोबाइल किंवा लॅपटॉप हॅकिंगपासून सुरक्षित राहतो.

बाइटसील हे उपकरण व त्याचे सॉफ्टवेअर विकसित करण्यास २०१८ मध्ये सुरुवात केली. मात्र, कोविडमुळे आमची दोन वर्षे वाया गेली. २०२२ मध्ये पहिल्यांदा हे उपकरण वापरण्यासाठी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यात बदल करत गेलो. सध्या हे उपकरण हॅकर्सपासून सुरक्षित करण्यास आम्हाला यश मिळाले आहे.
- निखिलेश वाणी, आयटी अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com